020-2587 1086

info@icareclinic.in

आय केअर क्लिनिक ची छोट्या दोस्तांसाठी सामाजिक कामगिरी

आय केअर क्लिनिक पाषाण ने सनशाइन प्रिस्कूल येथे छोट्या दोस्तांसाठी कॅम्प केला. ७० पेक्षा जास्त मुलांचे आरोग्य व डोळे तपासले. मुलांना बोलते करून डॉक्टर यांची भीती कमी करण्यासाठी छोटी गोष्ट सांगण्यात आली. त्यासाठी बाहुल्यांच्या वापर करण्यात आला. प्ले ग्रुप ते सिनियर केजी मधील सर्वे मुलांची तपासणी केली. आरोग्य  तपासण्याचे  काम प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ  प्राजक्ता किंमतकर ह्यांनी केले. त्यामध्ये मुलांची उंची ,वजन , कान, तोंड, पोट ,छाती ह्यांची पुर्णपणे तपासणी केली गेली. डोळा तपासण्याचे काम आय केअर क्लिनिक च्या संचालिका डॉ अरुंधती पांडे ह्यांनी केले. त्यात डोळे , मागचा पडदा तपासाला गेला. गरजेनुसार महत्वाचा सल्ला देण्यात आला. सनशाइन प्रिस्कूल च्या मुख्याध्यापिका रुक्मिणी कर्णूल ह्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. सर्वे शिक्षकांना सुचना देऊन शांतपणे तपासणी करण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी निभावली. आय केअर क्लिनिक पाषाण ला सर्वे शिक्षक आणि मावशी ह्यांनी मदत केली.शाळेच्या विनोथानी ह्यांनी सर्वांचे आभार मानले. डॉ  प्राजक्ता किंमतकर , डॉ अरुंधती पांडे ह्यांचा सत्कार करण्यात आला.

admin

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *